भूक.....

Started by Ravi Padekar, October 28, 2015, 02:31:00 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar


नाही कुठे थारा   
नाही कुठे आसरा
जीव व्याकुळ हा
भुकेने सारा

धक धक जिवाची
होतिया सारी
पोटातल्या कळकळीला
लागे भुकेची भाकरी

घाम गाळण्यास
कुठे मिळेना काम,
कामासाठी लागे,
शिक्षण जाम,
नशिबाने दिली झोळी हातात,
झोळीमध्ये भिकेचे मिळे न दाम

चांगल्या वृत्तीचे नियम मोडले
पोटासाठी आता पैसे चोरले
भूक भागण्या लोभ अंगीकारले,
व्यसनाधीन होऊन विषयात अडकले
आयुष्य हे सारे आपल्या हाताने विस्कटले

भूक राहिली कुठे आता भाकरीची
भूक लागली फक्त लोभाची
भूक दोन भावांमधल्या जमिनीच्या वाट्याची
भूक आहे ही अहंकाराची...
भूक नात्यांमध्ये फुट पाडण्याची
भूक माणसातल्या वाईट कृत्याची....

                                                      कवि:-रवी पाडेकर (8454843034)
                                                      मुंबई, घाटकोपर.