पूर्ण चंद्र पाहताना नभी

Started by sameer3971, October 29, 2015, 11:40:29 AM

Previous topic - Next topic

sameer3971

पूर्ण चंद्र पाहताना नभी
जुन्या स्मृतित घूटमळलो कधी
असेच कुठले क्षण जुने जुने
डोळ्यात तरळले होते कधी कधी !!

एकांत तो हवा हवा सा
पण न्हव्तोच एकटा मी कधी
तुझीच सावली, सावलीस माझ्या
लटकी रुसलि होती कधी कधी.
असेच कुठले क्षण जुने जुने
डोळ्यात तरळले होते कधी कधी !!

वार्याची ती आस हवीहवी शी
पण न्हवता बेधुन्द तो कधी
तुझ्या बटांची बोटात माझ्या
झाली वर्तुळे होती कधी कधी
असेच कुठले क्षण जुने जुने
डोळ्यात तरळले होते कधी कधी !!

वाचले तुझे गीत हवे हवे से
न्हवते सूर थांबले कधी
तुझ्या शब्दांचे शब्दात माझ्या
शेर जुळले होते कधी कधी
असेच कुठले क्षण जुने जुने
डोळ्यात तरळले होते कधी कधी !!

समीर बापट
२९ अक्टोबर २०१५.

मिलिंद कुंभारे

वार्याची ती आस हवीहवी शी
पण न्हवता बेधुन्द तो कधी
तुझ्या बटांची बोटात माझ्या
झाली वर्तुळे होती कधी कधी
असेच कुठले क्षण जुने जुने
डोळ्यात तरळले होते कधी कधी !!

छान..... :)