बौद्ध धम्म

Started by sanjay limbaji bansode, October 29, 2015, 10:58:55 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

बौद्ध धम्म जगात न्यारा
दुसऱ्या धर्माशी जोडू नको  ॥

देव म्हणुनी पूजुनीं बुद्धाला
बापाच्या, 22 प्रतिज्ञा मोडू नको॥

संपव रं तो मनुवाद आता
हात तयाला कधी जोडू नको ॥

प्रज्ञा शील करुणा घे बुद्धाची
अहिंसेला कधी खोडू नको ॥

माझ छान दुसऱ्याच घाण समजूनी
एकात्मता कधी फोडू नको ॥

जे आहे त्यात समाधान मानुनी
नाही तया साठी रडू नको ॥

बुद्धाचेच दे विचार जगा
भलतेच ते बडबडू नको ॥

समाजाशी कर डोळस साऱ्या
अंध संस्कार ते जडू नको ॥

धम्म तुझा तो वाच बुद्धाला
दुसऱ्या धर्मासमोर पसरू नको॥

आयुष्यात विसरला जरी कुणास तु,
बुद्धमं शरणमं विसरू नको
धम्ममं शरणमं विसरू नको
संघमं शरणम विसरू नको

नमो बुद्धाय जय भीम
संजय बनसोडे 9819444028