स्वप्न

Started by vishal maske, November 02, 2015, 08:15:34 PM

Previous topic - Next topic

vishal maske

~!!! स्वप्न !!!~

तुझं गालातलं हसणं
स्वप्नात सुध्दा येऊ लागलं
अन् स्वप्न संपण्याच्या भीतीने
ह्रदय माझं भीऊ लागलं

तु स्वप्नात आली की
रात्र संपुच नये वाटतं
अन् स्वप्न तुझं संपलं
की काळीजंच फाटतं

तुझं स्वप्न पाहण्यासाठी
रात्र अपूरी झाली आहे
दिवसा स्वप्न पाहण्याची
सवय मला झाली आहे

तुझ्या स्वप्नाच्या दुनियेत
मी रात्र रात्र हरवतो
मग विनाकारण मन माझं
तूझ्या स्वप्नातंच फिरवतो

रात्रंदिवस तुझं स्वप्न
मला रोज रोज पडावं
आशा आहे माझं स्वप्न
आता तुलाही पडावं...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो : 9730573783

कविता आवडल्यास नावासहित शेअर करू शकता

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर : 9730573783