भग्न आशा

Started by shardul, November 04, 2015, 07:41:10 PM

Previous topic - Next topic

shardul


तुला विसरणे मला कठीण जाते
पण तू फार विलंब केलास
परत भेटूया म्हणालास
पण गेलास तो गेलास


मंगळसूत्र बांधशील
या आशेत मी उगीच होते
नंतर काय काय घडले
मी किती खाल्ले गोते


आशा खूप लावलीस
शोभले का हे तुला
दुःख माझ्या मनीचे
कसे सांगू रे तुला


तुझ्याबरोबर विमानतळावर
सांग कोण होती ती
विश्वास बसणे कठीण होते
गुंग झाली माझी मती


निदान ओळख करून द्यायची ना
सगळेच मला गूढ आहे
केवळ आशेवर जगणारी मी
खरच मोठी मूढ आहे


प्रिन राम म्हात्रे