तहान

Started by Dnyaneshwar Musale, November 05, 2015, 12:38:04 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तापले हे रान
झाडानाही टाकली मान
भागवना नभा माझी तहान

नदी नाले झाले कोरडे
जनावरही फोडतात हमबरडे
रस्ते ही झाले उदास
पावसाला पडले ग्रहण खग्रास

माळराने झाली वाळवंट
फुटु लागला शेतकरयाचा कंट
पेटला हा निखारा
गंज चढला पाखरा
आता भागवना नभा माझी तहान

कशी भागवणार तहान
पोर अजुन आहेत लहान
मायेला कुरवाळीतय लेकरु
जस गाईला चाटतय पाण्यावाचुन वासरु .
आता भागवना  नभा माझी तहान
फुलन समद रान
फुलन समद रान.