कुणी माझे , मजसाठी , माझ्याशी गुणगुणते सा रे ग

Started by gaurig, December 15, 2009, 05:00:28 PM

Previous topic - Next topic

gaurig


दूर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझिमते !
केव्हा केवळ भणाणणारा
पिसाटलेला पिऊन वारा
अनवाणी पायांनी वणवणते !
कुणी माझे , मजसाठी , माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प
प ध प ग म
म प म ग रेगरे
रे ग रे नी सा

कधी ऊन्ह लागता मध्यान्हीचे मनात मी डळमळतो
अन थकलेल्या पायांसह माझ्या सावलीत घुटमळतो
तो येतो तेव्हा मेघ जसा , अन वदतो जर दमलास असा
तर माझ्याशी येशील कसा अन केव्हा
हिरमुसल्या वाटांना मग अवचित लय मिळते

मी असाच वेडा जीव लावुनी प्रेम कराया बघतो
मी म्हणतो कोणा आपुले आणि तो माझ्यावर हसतो
मग जीवच होतो रुसलेला आर्ध्या वाटेवर फसलेला
अन डावच मोडून बसलेला त्या वेळी
त्याचेही मन तेव्हा सांजावुन थरथरते

मी रंगबीरंगी फुले कागदी पाहुन केव्हा झुरतो
तो हसतो केवळ हसता हसता मला ओढुनी म्हणतो
हे आत पसरले तुझ्या सडे पाहसी कशाला जगाकडे
त्यावाचुन केव्हा काय अडे अपुले
मग ग़ाणे स्वत्वाचे प्राणातुन झगमगते....
सा रे ग म प
प ध प ग म
म प म ग रेगरे
रे ग रे नी सा