कोण तू???

Started by shetye_pranav, November 11, 2015, 09:39:17 AM

Previous topic - Next topic

shetye_pranav

असा हा मंद, धुंद, थंडगार, वाहणारा वर,
या वाऱ्यातील एक झुळूक तू!!

असा हा रिमझिम बरसणारा पाऊस,
या पावसातील एक सुंदर सर तू!!

असा हा धरतीवर कोसळणारा लखलखता सूर्यप्रकाश,
या सूर्यप्रकाशातील कोवळे उन तू!!

असे हे क्षितिजावर पसरलेले सप्तरंगी इंद्रधनुष्य,
या इंद्रधनुष्यातील एक रंग तू!!

अशी हि नागमोडी असलेली वाट,
या वाटेवरील एक नाजूक वळण तू!!

अशा या फुललेल्या मनोरंजक फुलांच्या बागा,
या बागेतील एक उमललेले फुल तू!!

असे हे दुसऱ्या प्रहरी पडलेले धुके,
या धुक्यातील एक दवबिंदू तू!!

असे हे मनी उठलेले वादळ विचारांचे,
या वादळी विचारांतील एक गोड आठवण तू!![/size]