माणूस आणि जीवन

Started by shetye_pranav, November 13, 2015, 10:34:48 PM

Previous topic - Next topic

shetye_pranav

नऊ महिने अंधारात काढून प्रकाशात येतो जो,
निव्वळ कोरा कागद असतो माणूस तो,
अश्याच त्याच्या आयुष्यात असते सुख-दुखाचे मिलन,
एकटा तो माणूस एकटेच हे जीवन...

पाढे हे अवघड, अंकगणितहि सोपे नव्हे,
डागाळलेले चारित्र्य कुणाला बरे हवे,
संघर्ष असतो स्वतःशी, स्वतः असतो स्वताचा विलन,
एकटा तो माणूस एकटेच हे जीवन...

नाजूक ते वय, कठीण ते चढण,
यशाच्या रांगेत कधी होणार गणन,
सोप्या या अक्षरांचे सुबक जसे वळण,
एकटा तो माणूस एकटेच हे जीवन...

अपयश जरी छोटे, टोचते तरी खूप,
मराठी माणसाला स्वाभिमानाची मोठी भूक,
नैराशाच्या नभी आशेचा एक किरण,
एकटा तो माणूस एकटेच हे जीवन...

चांगले विचार ज्याच्या अंगी तोच खरा श्रीमंत,
स्वभावाने जो बरा, तोच खरा खुरा जिवंत,
परंतु चांगुलपणाच्या व्याखेला पैशाचे कथन,
एकटा तो माणूस एकटेच हे जीवन...

सर्वत्र पसरले आहे आरक्षणाचे सावट,
महिलांना ३३, तर पुरुषही या वयात चावट,
मानसिक हि पीडा आता नाही होत सहन,
एकटा तो माणूस एकटेच हे जीवन...

खडतर या आयुष्याला दुखाचा मेळ,
जरूर बदलते अंती प्रत्येकाची वेळ,
झेप त्या गरुडाची, दूर ते गगन,
एकटा हा माणूस, एकटेच हे जीवन...

कष्ट या जगती चुकले नाही कुणाला,
पाण्याच्या सुखद आधार तहानलेल्या जीवाला,
शिखरे हि उंच गाठण्यास लागते जिद्द आणि लगन,
एकटा तो माणूस एकटेच हे जीवन...

कोणतेही काम नसते हो शुल्लक,
समाधानातून मिळणारा आनंद असतो जय्यत,
थोर त्या गणपतीचे उंदीर हे वाहन,
एकटा तो माणूस एकटेच हे जीवन...

माणुसकीच्या नात्याला भ्रष्टाचाराचा कलंक,
बलात्काराची संज्ञा हि तितकीच ज्वलंत,
समजाल तर हे विषय देखील आहेत गहन,
एकटाच हे माणूस एकटेच हे जीवन...

आलेला असतो हा बनून एक कोरा कागद,
आयुष्याच्या शेवटच्या दारी यम करतो त्याचे स्वागत,
अंती सर्वांच्या लिहिले आहे हो मरण,
असाच एकटा जातो माणूस आणि असेच संपते त्याचे जीवन...