जिंकण्याचा विश्वास

Started by sameer3971, November 14, 2015, 01:14:27 PM

Previous topic - Next topic

sameer3971

पाण्याला समुद्राची गाज
ऐकू आली तर
त्याची नदी बनते
आणि सागराला जाउन मिळते
नाही तर पाणी डबकेच
बनून राहते.
तसेच जीवनाला विश्वासाची
जोड मिळाली तर आयुष्य
उत्तुंग भरारी घेते
नाही तर नैरशयेच्या
गरतेत अडकून राहते...

किती काळ नुसतेच
विचार करत राहायचे
कधी तरी बंड पुकारुन
उफाळुन वर उठायचे
समुद्रा गाज देताच असतो
पण आपण पाण्याचे रूप
घेऊन उसळायचे असते
भिडस्त होऊन त्यात
मिसळायचे असते.

वेळ येईल, वेळ जाईल
हिन्दोला जिंदगीचा
कधी उंच तर
कधी खालती होईल
आपणमात्र आपलीच
हार मानायची नाही
जिंकणार तर मीच हा
विश्वास कधी सोडायचा नाही


समीर बापट
मालाड मुंबई,