नाते तूझे नी माझे

Started by sameer3971, November 15, 2015, 12:53:04 PM

Previous topic - Next topic

sameer3971

नाते तुझे नी माझे, हळुवार का फूलावे!
गंधीत तुही व्हावे, मुग्धीत मी असावे!

नाते तुझे नी माझे, लपून का रहावे!
उसळून तुही यावे, समरसून मी ते घ्यावे!

नाते तुझे नी माझे, कुजबुज का असावे!
आरोळी तु ही व्हावे, आकांत मी असावे!

नाते तुझे नी माझे, निशःब्द का असावे!
शेर तुही म्हणावे, शायरीत मी गुंफावे!

नाते तुझे नी माझे, मिटलेले का असावे!
ओठांनी तुही गावे, अधरांनी मी चुंबावे!

नाते तुझे नी माझे, एकांती का असावे!
सोहळ्यात तु आलापवावे, मैफीलीत मी रचावे!

नाते तुझे नी माझे, आजचेच का असावे!
आजन्मतुही जपावे, आयुष्य मी वेचावे!

नाते तुझे नी माझे, लज्जीत का असावे!
बेबंध तुही व्हावे, बेधुंद मी असावे!

नाते तुझे नी माझे, अल्लड का असावे!
अवखळ तुही व्हावे, खट्याळ मी असावे!

नाते तुझे नी माझे, फक्त तुझे नी माझे असावे!
डोळ्यात प्राण घेऊन, हृदयात ते वसावे!!

समीर बापट
मालाड, मूंबई.