खडा पहारा

Started by MURALIDHARSHIRSATH, November 16, 2015, 07:12:19 PM

Previous topic - Next topic

MURALIDHARSHIRSATH

खडा पहारा
|| आकस्मित आक्रमण करती ||
|| भारता लुटण्या दुर्जन बघती ||
खडा पहारा ठाका बंदुका
सज्ज असूया सिमेवरी सैनिका ||
मातृ भूमीच्या वीर रक्षकानो
जागृत रहा रे सदा गड्यानो
टेहाळणी ठेवा अवती भवती
पुढे शत्रुचा धोका ||
सीमेत शिरता शत्रूंच्या फौजा
प्रत्येक गोळीने पाणी रे पाजा
थोपवा त्यांना शस्त्रबळाने
आडवा खिंडी  नाका
कोटी कोटी भारतीय जनता
पाठीशी असता कशाला चिंता
युद्ध प्रसंगी सहाय्य करील
सह्याद्री पाठीराखा ||
महान वैभवी भारत अपुला
आजवरी तया थोरांनी जपला
तयाच्याच परिश्रमाने लाभला
स्वातंत्र्याचा मोका ||
रणात लढुनी जे बळी गेले
अमर जगती ते वीर झाले
मुरार संगे स्मरा योद्ध्यांना
या मातेची अब्रू राखा ||     


                               मु. ग. शिरसाठ
                           ९२७०१२७७६७