अनाहूत कविता

Started by MK ADMIN, November 18, 2015, 04:24:58 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN


मी तर कधीच नव्हतो कवी
कारण कविता कशासी खावी
हेही नव्हते मला माहित
मनात माझ्या गजला नाहीत
तरीही क्वचित खरडल्या ओळी
कुणी म्हणोत त्याला चारोळी
पण असेल ती तर आरोळी
रिकाम्या मनाने झटकलेल्या आळसाची
जणू निरभ्र आकाशातून पावसाची
सर कोसळावी अन वाटावी नवलाई
बोलावे "अगा हे अवचित झाले कैसे
मी तर काही जाणूनबूजून केले नव्हते
--------कृष्णकुमार प्रधान