कटाक्ष नयनांचे

Started by akshayvatharkar, November 22, 2015, 08:19:46 PM

Previous topic - Next topic

akshayvatharkar

समजे ना समजे कोणास तुझी या नयनांची भाषा,
मज मात्र उमगले या जगाच्या रहस्याचे वलय पाहून तुझी हि निर्मल किमया.

वर्गात लक्ष लागेलच कसे, दृष्टीच तुझिया मन विचलित करे,
कोण आले नि कोण गेले, मनाचे कुंपण सतत तुझ्याच भोवती गुंतले.

फळ्यावर चाले विविध आकड्यांचे खेळ, कोणास नाही कोणाचा ताळमेळ,
मी तर एवढीच आशा बाळगून एकटक फळा न्याहाळत, इवलीशी का होईना तुझी दृष्टीच का मला लाभत.

वर्गात तुझी उपस्थिती वाटे मला परिक्षेहून अधिक महत्वाची ,
आयुष्यातील सारे ध्येय भान विसरलो,भूल पडली तुझ्या एका नजरेची.

बघता बघता कॉलेज संपले,दुखः केवळ एकाच गोष्टीचे राहिले,
नशिबाने आपली भेट मात्र शेवटपर्यंत घडवली नाही.
पण तरीही तुझी प्रतिमा आजवर मनात जपली आहे,
तव नयनांचे दालन मनात साठवले आहे.