कवेत तुला...

Started by Nitin Bagde, November 23, 2015, 06:57:04 PM

Previous topic - Next topic

Nitin Bagde

कवेत तुला घेत्या क्षणी,
श्वास देखील अधीर होतो...
तु असण्याचा प्रेम पुरावा,
त्या क्षणांना देत राहतो...

सुखद अनुभव वेल सुखाची,
आपल्या प्रवाहात फुलत राहते...
चोरटी ही फुलपाखरे,
सुख त्यातले चोरु पाहते...

रातराणीच्या रात तारका,
चमकुन प्रकाश उधळे...
चमचमनारे चांद-तारे,
प्रेम पाहताच झाले खुळे....

समुद्राचा प्रवाह अचानक,
पाहत्या क्षणी मंद झाला....
हळुच स्पर्शुन पायांना,
साक्ष देण्यास राजी झाला...

          तुझी मिठी.....
                                      मनस्पंदन...
                                        -नितिन...