उन्हामधला पाऊस थेंब..

Started by Nitin Bagde, November 25, 2015, 02:35:29 PM

Previous topic - Next topic

Nitin Bagde


उन्हामधल्या पाऊस थेंबांना,
चेहेर्यावर झेलताना...
पाऊसाच्या थेंबां सोबत,
मनसोक्त खेळताना...
मला फक्त,
तुझीच याद येते....

उन्हाची होते सावली,
आणि थेंबांचा त्यात मारा....
उन्हाची ती गर्मी,
आणि वाहतो थंडगार वारा...
हे सोबत असताना,
मला फक्त...
तुझी याद येते...

पाऊसाचा तृप्त थेंब,
मुठीत जेव्हा येतो...
मुठी मधल्या थेंबाला,
मी हळूच मिठीत घेतो...
आणि मनात फक्त...
तुझी याद येते...

पाऊसाच्या अबोल सरी,
थेंबांसोबत बरसत असतात...
डोळ्यांमधल्या अक्षू सरी,
तुझ्याच आठवनीत बरसत असतात...
पाऊस हा प्रत्येक्षात येतो....
पण..
तुझी...
फक्त याद येते......

                                      मनस्पंदन..
                                         नितिन...

sameer3971

पाऊसाचा तृप्त थेंब,
मुठीत जेव्हा येतो...
मुठी मधल्या थेंबाला,
मी हळूच मिठीत घेतो...

good one