ते कोणते चित्रा रोज मला खुणावते ग आई?

Started by sameer3971, November 27, 2015, 02:45:32 PM

Previous topic - Next topic

sameer3971

आई, मला तुझ्याशी
थोडे बोलायचे आहे
मनातले गुपित माझ्या
तुला सांगायचे आहे.

आजकाल माझीच स्वप्ने
खुणावतात मला
धूसर से कोणी तरी
दाट धूक्यात दिसते मला

स्पंदाने हृदयाची
उगाचच वाढतात का ग?
झोपेत सुद्धा कधी कधी
चेहेरा गुलाबी होता का ग?

चेहेरा त्याचा दिसतच नाही
कोडे हे कसे उलघडतच नाही
सांग ना मला झालेय तरी काय
आई.....
कर ना मदत, हसतेस तू काय

जा......
बोलणार नाही तुझ्याशी आता
मनातले सांगणार नाही मी आता
पण तरी एकदाच सांग ना आता
उगाचच हृदयाचे ठोके
वाढतात का ग आई?
ते कोणते चित्रा रोज
मला खुणावते ग आई?

समीर बापट
मालाड, मुंबई.