२६/११

Started by smadye, November 29, 2015, 11:37:03 PM

Previous topic - Next topic

smadye

 २६/११

२६/११ तारीख होती
अमानुषपणाची कहाणी होती
लपून छपुन हल्ला केला
पण मुंबई पोलिस नाही घाबरला

पराक्रमाची शर्त केली
आतंकवाद्यावर मत केली
वीर धारातीर्थी पडले
पण शत्रूला शरण आणिले

वीरगतीत  हिरे गमाविले
सांग शत्रू  तू काय मिळविले
भारतात वीरांची कमतरता नाही
पण शत्रू  तुझ्या शत्रूबुद्धीला काही अर्थ नाही

शत्रूत्वाचे तू बीज पेरले
तुझ्या देशी तेच झाड फोफावले
भारतीय वीराकडून  तू कधी धडे घेणार
आपलि शक्ती तू प्रगतीसाठी कधी लावणार

असेल धडपड तुला पुढे जाण्याची
गरज आहे तुला भारतीयाकडून शिकण्याची
प्रगतशील व्हाव्हे का लढत राहावे
ह्याचे शहाणपण तुला कधी कळावे?

मरता मारता तू संपशील
तुझ्या देशाचा विनाश तूच घडवशील
प्रेमाचे लेणे भारतीयाकडचे
असेल अक्कल तर तू आत्म्सावे

त्यानेच तुझी प्रगती होईल
जनतेत प्रेमाची वेल फोफावेल
भारतापासून तू जन्माला
भारतच तारी शकेल तुला

हे जेव्हा तुला कळेल
द्वेषभाव तू सोडशील
लक्षात ठेव भारतात वीरांची कमतरता नाही
पण शत्रू  तुझ्या शत्रूबुद्धीला काही अर्थ नाही 

     सौ सुप्रिया समीर मडये
  madyesupriya@gmail.com

vishal patil

chan kavita ahe..mla khup aavdli...

smadye