चाफेकळी...!!!

Started by Ravi Padekar, December 05, 2015, 03:21:32 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

आहे कोण ही चाफेकळी
खुलविते मनी प्रेमाची पाकळी
मदहोश करे जीवाला, 
पाहुनी तिची गालावरची खळी
आहे कोण ही चाफेकळी......!!  धृ !!

सुंदर तिचे रूप साजिरे
पाहण्यास तिला त्या सांजवेळी
नजरेनेच केले काळीज घायाळ,
अदा पाहुनी तिची ती निराळी
कोण आहे ही चाफेकळी
खुलविते मनी प्रेमाची पाकळी....!! १!!

बेधुंद होउनी या पावसाळी
भिजले अंग सुगंधात दरवळी
नाचण्यास आतुर पैंजण,
छम छम वाजते पाहुणी आभाळी....!! २ !!

आहे कोण ही चाफेकळी
खुलविते मनी प्रेमाची पाकळी
मदहोश करे जीवाला, 
पाहुनी तिची गालावरची खळी... !! ३ !!

कवि:- रवि  पाडेकर.