जपा मायबोली मराठी

Started by gaurig, December 16, 2009, 03:23:00 PM

Previous topic - Next topic

gaurig

इंग्रजीच्या नादापयी झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल....

इंग्रजीच्या पेपरात होऊन जतो काठावर पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास.....

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी म्हणते हें बावल्या
अन आय लव यु म्हटल्या वर मनात मारते उड्या....

माय झाली मॉम आणि बाप झाला आता ड्याड
रेव्ह पार्टीत शेण खाऊन पोर झाली मॅड.....

मराठी सिनेमा पाहायला दिसतात मोजकेच लोक
पण इंग्रजी पिच्चर म्हटले की राह्याते डोक्यावर डोक......

भांडण करते बायको घरात बाब्या ला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका......

मराठी विसरत चाललेले शाळेतले शिक्षण
मराठी आक्सीजन वर अन चालू इंग्रजीचे रक्षण........

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असते गुडी पाडवा

सावध व्हा मित्रहो , जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोलो सारे मराठी रक्षणा साठी.  

Unknown