गुगली

Started by Siddhesh Baji, December 16, 2009, 03:23:38 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

नव्या घरी आल्यावर सौ. सगुणा कुडकुडेंनी शेजारच्या घराची पाटी वाचली. 'श्री. नंदकिशोर पाचपुचे'. 'अय्या, हा माझ्या शाळेतला हँडसम नंदू तर नव्हे.' त्यांनी बेल वाजवली. एका पोट सुटलेला, टकलू, जाड भिंगवाल्या इसमाने दरवाजा उघडला.

सौ. सगुणा : नंदू... आपलं नंदकिशोर पाचपुचे? आम्ही तुमचे नवे शेजारी. तुम्हाला एक विचारायचं होतं. लहानपणी तुम्ही पोंगुडेर् गुरुजी प्रशालेत होता?

नंदकिशोर : हो.

सौ. सगुणा : १९६५ साली दहावी झालात.

नंदकिशोर : बरोबर. पण तुम्हाला कसं कळलं.

सौ. सगुणा (लाजत) : तुम्ही किनई माझ्या वर्गात होता.

नंदकिशोर : काय? खरंच? कोणता विषय शिकवायचा तुम्ही मॅडम?