*** तुझ्या... ***

Started by धनराज होवाळ, December 09, 2015, 07:52:43 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


👸🏼📝 तुझ्या... 📝👸🏼

तुझ्या बोलण्यात भुलत गेलो,
तुझ्या हसण्यात गुंतत गेलो..
माझ्याकडे पाहायचीस तेव्हा,
तुझ्या श्वासात फुलत गेलो..!!

तुझ्या मनात मुरत गेलो,
तुझ्या हृदयात बसत गेलो..
रात्री शांत झोपायचीस तेव्हा,
तुझ्या स्वप्नात झुलत गेलो..!!

तुझ्या लाजण्यात लाजत गेलो,
तुझ्या रुसण्यात रुसत गेलो..
तु मजवर रागवायचीस तेव्हा,
तुझ्या रागवण्यात रुतत गेलो..!!

तुझ्या आनंदात पुरता हसत गेलो,
तुझ्या दुःखात अश्रु पुसत गेलो...
एकांतात तु होतीस तेव्हा,
तुझ्या जीवनात घुसत गेलो...!!!
-
स्वलिखित...
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली.
मो. ९९७०६७९९४९
❤❤❤❤❤❤❤❤❤