तू का बोलत नाही , तुझ्या हृदयाच्या भावना...

Started by Poonam chand varma, December 12, 2015, 12:08:16 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

तू का बोलत नाही , तुझ्या हृदयाच्या भावना
का जाणून घेत , नाहि माझ्या या वेदना...

तुला सुद्धा आहे  , माझ्या प्रेमाची तहान...
तरी सुद्धा बोलत नाही , मनाचे तू कहाण...

का वाट बघतेस तू ,  पहिल्या माझ्या बोलण्याची...
का तू प्रयत्न करीत नाहीस , तुझ्या मनाला तोलण्याची....

जिवलग मित्र म्हणून , माझ्या वर हक्क जमाविते
बोलत मात्र तेच नाहींस , जे मनात तुझ्या असते...

डोळे, हाव - भाव तुझे, सर्वच मला सांगतात ...
प्रेम रंग तुझ्या मनात, माझ्याविषयी रंगतात...

तशी तर तू आहेस , माझ्या मनाची सखी,
तरी सुद्धा नेहमी करतेस , न बोलण्याची चुकी....

माझ्या वरती जीव तुझा, आता सर्वानाच समजतो ...
तू मात्र बोलत का नाही, हाच विचार मन करतो ...

मी पाहाल केली असती, पण मन माझे आटते...
मैत्री पलीकडील या नात्याचा,  तुटण्याची भीती वाटते....

नसेल जीवनात प्रेम तुझा, तरी मला चालेल...
पण तुझी मैत्री जर नसली , तर जीवन मात्र थांबेल...

@ Poonam V  :)
@ Poonamchand V