पण माझा आभास आहेस तू....

Started by Poonam chand varma, December 15, 2015, 01:28:12 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma



माझा आभास आहेस तू....

स्वप्न-स्पर्शामुळे बहरलेलि सकाळ , आहेस तू
उष्म-शीत संवेदनेने शाहारलेली दुपार , आहेस तू

केसरी सुहावणी लुभावणारी संध्याकाळ , आहेस तू
चंद्रकलेसारखी वाढत चांदणी रात्र  , आहेस तू

फक्त तुझ्यामुळेच या जीवनाला अर्थ आहे,
तुझ्या विना मरण सुद्धा माझे व्यर्थ आहे ...

फक्त तुझ्यामुळेच मिळाली या जीवनाला दिशा..
यशस्वी झालो या जीवनात, संपली माझी दुर्दशा....

उघड्या डोळ्यांनी दिसणारे , स्वप्न आहेस तू
बंद पापण्यां मध्ये थांबलेलं आश्रू आहेस तू

माझ्या या जीवन संघर्षाचा , आधार आहेस तू
जग वादळाच्या समुद्रातून बाहेर काढणारा,  मंझधार आहेस तू...

सांग तुला शोधू कुठे , का माझ्या श्वासात आहेस तू  ?
नसेल  जरी या जगात , पण माझा आभास आहेस तू....

@ Poonam chand Varma   :)
 
@ Poonamchand V

AmitRaj

खूप मस्त आहे कविता ..आवडली ..