मधुचंद्र

Started by rushi@rugvedi, December 15, 2015, 06:23:57 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

   मधुचंद्राची रात्र होती,
   साक्षीला  चंद्र होता,
   एक माझ्या कवते तर ,
   दुसरा नभात होता,
   जशी तू आली मिठीत
   तसा तो ढगाआड गेला
   तुला माझ्या मिठीत पाहून,
   तो शरमून गेला, तो शरमून गेला,

   हवेतदेखील गारवा होता,
   श्रावणाचा ऋतू हिरवा होता,
   वाराच्या झुळके सोबत,
   रातराणी चा सुगंध होता,
   चांदण्यादेखिल होत्या,
   त्यांची प्रीत देखिल होती
   तुझा माझ्या मधुमिलनाची,
   ती मधुचंद्राची रात्र होती 

   खळखळ पाणी वाहत होत,
   मंजुळ गाणी गात  होत, 
   मनामधली भावनांना,
   पुन्हा छेडून जात होत
   आज तुझ्या प्रेमाची,
   बरसात होणार होती
   तुझा माझ्या मधुमिलनाची,
   ती मधुचंद्राची रात्र होती