मान्य आहे मला , तुझ्या सर्व भावना

Started by Poonam chand varma, December 18, 2015, 12:00:34 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

हो मान्य आहे मला , तुझ्या सर्व भावना
हो करतो मी कविता , धरून तुझीच कल्पना

तुझ्या रुप सौंदर्याला , देतो मी शब्दाचे शृंगार
यामुळेच मिळते माझ्या , प्रेम-कल्पनेला आकार

हो तूच आहेस माझ्या ,  मन-कवीची प्रेरणा
तुझ्यामुळेच येतो माझ्या , कवितेंना रसपणा

तुझ्या कमल-हास्याने , खिलावितो माझी संकल्पना
तुझ्याच भाव-रंगाने, रंगवितो माझी  परिकल्पना

पण,

वाटतो तर सर्वांनाच , चंद्रा सुद्धा हवा- हवासा
पण मिळत नाही तो तसा , गगना वरचा राजसा

कल्पना तर असू शकतात , चंद्र वरती लिहिलेल्या
पण कधीच नसतात त्या , चंद्र साठी रचलेल्या

ह्या शब्द-भावना तर , फक्त माझ्या प्रियेसाठी
तिला आठवण्यासाठी , तर माझ्या साठवणीसाठी

माझ्या कवितेत नेहमी , असते  तिचीच आठवण
तुझ्यावरी जरी लिहिल्या , तरी मनात तिची साठवण
 

म्हणून सांगतो तुला, गैरसमज तू करू नकोस
माझ्या कवी-भावनेला , विरोधार्थी समजू  नकोस..



@ Poonam chand varma  :(
@ Poonamchand V