कसे मी समजू तुला, तूच मला सांग आता ....

Started by Poonam chand varma, December 19, 2015, 11:07:09 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

काय तुझ्या मनात ,मनाला माझ्या  कळत नाही
स्मित हसणे तुझे, मला कधी समजत नाही

कधी जवळ असते, जसे हृदयास्पंदन हृदयाचे
दूर इतकी जाते कधी, जसे चंद्र-नंदन आकाशाचे

कधी नयन तीर सोडून, करतेस तू घायाळ
तर कधी तूच बोलते , ते शब्द चार प्रेमळ

कोमलता तुझी बघून , मनाचा तोल जातो
सौन्दर्या स्तुती करण्यास ,ओठांना कौल येतो

तश्या तुझ्या भावना, जुडतात माझ्या भावनाशी
पण होते कधी चुकी ,गुंततात त्या एकमेकांशी

कसे मी समजू तुला, तूच मला सांग आता 
भावनांना माझ्या , बांध जरा बांध आता

@ Poonam Chand Varma  :)
@ Poonamchand V