भाकरी

Started by radhe92, December 27, 2015, 12:12:23 AM

Previous topic - Next topic

radhe92

                             # भाकरी #
भाकरी पाहिली
करपुसलेली,धूरसटलेली
चंद्र ,अर्धचंद्र,अर्धकोर
तव्यावरचीच ती ,चुलीवर भाजलेली
आईच्या हाताला चटके देवून
चविष्ट ,चवदार ,सुमुधुर झालेली
गरमागरम ताटात आलेली
तेलचटणी,भाजीसोबत जिभेवर विरघळंलेली
एका घासातच पोट ढेकर देणारी
मनतृप्त करणारी
बालपणी निमोनीच्या झाडाखाली बसून
आईच्या कुशीत ,मायेच्या हाताने
पोटात चंद्र-अर्धचंद्र जाणारी ......


आज थोडे दूर घरापासून
ती भाकरी फक्त हृदयात
हॉटेल मध्ये तीच रोटी झालेली
न तीला चव ,ना रस
फक्त चार दिवस जगण्यासाठी
चयन -पचन केलेली 
ना तिला माया ,ना प्रेम
पैसे देवून विकत घेतलेली..........


श्रीमंतीच्या रोटीपेक्ष्या  गरिबांची
भाकरीच बरी होती
गालिच्यावर न झोप लागते
गोधडीतील मायेची उबच श्रीमंत होती ...........


बोलले बरेच जण,
तुला आता भाकरी कशी दिसणार
श्रीमंतांच्या गलीतला तु प्यादा
तुझी भूक कशी भागणार ?
त्यांच्यासाठी काही शब्द ,
मरून मरून जगलो इथे
आता माघारी परतायचा आहे
दारे बंद करू नका
अजूनही माणूसच आहे
पैश्याच्या भूखेने घेतली होती झेप मोठी
भाकरी ना ताटी ,ना पोटी
होती ती दोन दिवस ढकलण्यासाठी
कदाचित ,
आलो जिवंत तर
मिठीत सामावून घ्या
नाहीच आलो जिवंत तर
चित्तेसाठी दोन इंच जागा द्या
भाकरीचा चंद्र -अर्धचंद्र
चित्तेवर फेका
कित्येक दिवस ना भेटलेल्या त्या भाकरीला
माझ्या करपूसलेल्या,धूरसटलेल्या प्रेतावर
माझ्यासमवे सामावू द्या
आस्वाद तिचा चाखू द्या .......

-संदिप बैलकर