तू एक फुल आहे, भाव तुझ्या पाकळ्या....

Started by Poonam chand varma, December 27, 2015, 08:46:41 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

तू एक फुल आहे, भाव तुझ्या पाकळ्या
एकरंगी नाहीस त्या, रंगबिरंगी साखळ्या...

सर्व रंग तुझ्यात , निसर्गाने भरलेले
सर्व भाव तुझे , यामुळेच शाहारलेले....

रागाच्या लाल रंगातं , होतेस जरी तू बेभान   
तरी शब्द तुझे कोमल असे , ज्याने होत नाही अपमान...

हास्याचा पिवळा रंग, पसरविते तू सगळीकडे
भान जगाचे विसरुन , सर्व मोहतात  तुझ्याकडे...

हिरव्या रंगाच्या उदासीत, शांत तुझे मन असते
बरोबर समजून जगाला, स्वतःलाच चुकीची भासते...

गुलाबी नात्यात बांधिले, प्रेम रंग तुझे तू जीवनी
दोन ह्रुदय असले जरी, धक-धक मात्र एका क्षणी....

चंचलता तुझ्या मानत , हिरनी सारखी केसरी
विचार मनाचे बोलण्याआधीच , करते अपेक्षा पुरी....

सुंदरता तूझी पांढरी , मिसळते प्रत्येक रंगात
तसेच वागणे तुझे , घर करते सर्वच्या मनात...

आणखी किती रंग तुझे, बोलू या शब्दात माझ्या
शृंगार या रंगाचाच, उत्तम दागिना आहे तुझा...

मी बनू या मित्र फुलाचा , आणखी त्याच्या रंगाचा 
नाही अपेक्षा यापलीकडे, मनापासून या जीवनाच्या...

रंग तुझे बघता बघता , जीवन असेच चालावे 
मनातले बोल हे तुझ्यावरचे, मनातच मी बोलावे....


@ Poonam chand varma  :)





   
@ Poonamchand V