मरण

Started by radhe92, December 27, 2015, 10:51:55 PM

Previous topic - Next topic

radhe92

               
                                  # मरण #
मरण दारी
हसत हसत उभा
घामाघूम शरीर
न श्वास घेण्यास ही मुभा  ..........

आवाज हसण्याचा
कानी निराळा
वेळ मरनाचा
खेळ जीवनाचा
कधी तुटेल श्वास
कधी फुटेल भाग्य
कोण जाणे  ..........

टिटवीचा आक्रोश
देहात भिनावा
मृत्यू पाऊल पाऊल
पुढे चालावा
आठवणीतल्या जाळ्यातले
धागे सोडवत सोडवत
मृतुनेच प्राण न्यावा  ..........

स्वनामध्ये गुंग की
सत्य हा आभास
गोठून जावा सारा देह
मरून जावा हा श्वास  ..........

फक्त तडफड तडफड देहाची
नजर शोधती पाणी ,
गिळंकृंत केलं पृथ्वीने
कधीच हातपाय
इथे हारलो फेकूनही
मनभर नाणी  ..........

आता क्षणभर घ्यावा विसावा
एवढीच मागणी
डोळा भरून घ्यावे साऱ्यांना
मग
निघेना का मळणी  ..........

संपला ,खेळ संपला
वर्तमान ,भूत ,भविष्य मातीत गेला
प्राण नेला ,देहच उरला
आगीच्या विस्तवात
तो ही मुरला
उरली राख
तीही नदी प्याली
अन वाटेवरच्या वाटसरुना
गळाभेट दिली  ..........

-संदिप बैलकर