स्त्री

Started by saru, December 17, 2009, 01:11:29 PM

Previous topic - Next topic

saru

राख होऊनी या देहाची
ती हे सांगून गेली
उरले हे मन जिचे
तिला मुक्तता काय कामाची?

पिंज्र्यातली मैना
पिंजऱ्यात राहिली
वाट दाखवून स्वातंत्र्याची
बंधनात पुन्हा अडकून राहिली

आकार या कुंभाला तू दिलास
मडके गेले हे कुणाघरी
वापर त्याचा झाला
नि फेकून दिले दूर कुठेतरी

झिजून आई-बाप या मुलीसाठी
काय जन्म तिचा, अन कशासाठी
गमावून आई-बाप जी
जगत राहिली फक्त इतरांसाठी

रंग-रूप ओळखून जिचा
अपमान होत राही
आज रस्त्यावरून जाताना
हक मारी एक टपोरी

हाल आज तिची कशी
चेष्टा सगळीकडे होत राही
निजलेले हे जग असेल
तर जाग कुणाला येई
 


अर्थ :
एक स्त्री जी मरूनही गेली तरी या समाजाचे रिती-रिवाज मरत नाहीत. हो, तिला स्वातंत्र्य तर आहे सर्वकाही करण्याचे तरीही आजही तिला हाच विचात करावा लागतो कि हा समाज काय बोलेल. मग तिला स्वातंत्र्य कसले मिळाले आहे? ज्या आई-वडिलांनी मोठी केली, तिला संस्कार दिले, ती हे घर सोडून गेली नांदण्यासाठी. पण सासरीही तिचा छळ झाला. दोष तिलाच लागला आणि घराबाहेर काढण्याची वेळ येऊन ठेपली. ज्या आई-वडिलांनी कष्ट करून तिला वाढविली तरी कशासाठी जिला फक्त एकाच गोष्ट शिकविली. इतरांसाठी जगण्याची. तरीही आज रंग-रूपावरून तिची अवहेलना करतात. मग ती गोरी कि काळी, "आई मला गोरीच बायको पाहिजे" फक्त हेच म्हणत राहतात मग तो मुलगा कितीही काळा असो. तिच्या मनाचा विचार कुणीही करत नाही. ती फक्त समजूनच घेत राहते. रस्त्यावरचे टपोरी मुले देखील तिची छेड काढतात. जर हे संपूर्ण जगच झोपलेले असेल तर जाग कुणाला येणार आहे



....SARIKA

amoul

mazya bahiniche ashru ani tumchi kavita , faar samya aahe,
tila yatun mukt karnyachech ya bhavache kaam aahe

santoshi.world

hya oli khup khup avadlya ..........  :'(

आकार या कुंभाला तू दिलास
मडके गेले हे कुणाघरी
वापर त्याचा झाला
नि फेकून दिले दूर कुठेतरी

झिजून आई-बाप या मुलीसाठी
काय जन्म तिचा, अन कशासाठी
गमावून आई-बाप जी
जगत राहिली फक्त इतरांसाठी