एक मैत्रीण आहे अशी...

Started by Poonam chand varma, January 03, 2016, 12:27:37 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

एक मैत्रीण आहे अशी...

माझ्यासारखीस भासणारी,
माझ्या विचारात मिसळणारी,
एकट्यात गुपचूप रडणारी,
मन खोलून हसणारी

बोलण्याआधीच मनाचे ऐकणारी
होण्याआधीच दुख मिटविणारी
सांगण्या आधीच इच्छा पूर्ण करणारी
अश्रू असताना हास्या आणणारी

निर्णयात अचूकता आणणारी
चुकल्यावर्ती प्रेमाने समजविणारी
पडत्या वेळेस तोल सांभाळणारी
माझ्यासाठी माझ्यावर रागाविणारी

स्वतःची सोडून माझी काळजी घेणारी
तिच्या प्रार्थनेत माझे सुख मागणारी
उपाशी राहून मला जेवण आणणारी
आधार बनून जीवनात माझ्या पाठीशी असणारी...

मनात प्रतीबिबित असणारी 
हृदयामध्ये श्वाश घेणारी
बंद डोळ्याने दिसणारी आणि
लवकरच आयुष्यात येणारी ......

@ Poonam chand varma  :)
@ Poonamchand V