जुनेच घाव ते रोज नवे होते ....

Started by प्रशांत दादाराव शिंदे, January 13, 2016, 12:23:34 PM

Previous topic - Next topic



जुनेच घाव ते रोज नवे होते
विसरावे कसे तेच कळेना मनास ह्या
वेडे मन सारखे तुझेच नाव घेते

तू येशील ....आस आजही तशीच मनास ह्या
मनाचे कोपरे तुझ्याविना रिकामे होते

डोळ्यांतही जाणवू लागलाय हल्ली दुख तुझे जाण्याचे
कोरड्या पापण्याही भिजतात गातो गीत तुझे ज्यावेळी

असेच का असते उदास मन माझे
असेल का तुझेही सारखेच
जाहले   होते दोन्ही मने एकरूप तेव्हा
आपल्याही प्रेमाचे एक घरटे होते

वेळ गेली बघ कित्ती  मागे आता
मी आजही मागेच तसाच रिकामे हाती राहिलो
आज  हि आठवण तुझी माझी भेट घेत असते
तुझ्या अंगणी येत नेमके दार बंद होते ......

मनास समजवायचे करतो लाख प्रयत्न
पण पुन्हा मागे जाऊन ते तुझेच चित्र सारखेच शोधते
अन मग जुनेच घाव ते रोजच  नवे होते ....

©प्रशांत डी.शिंदे....
दि.१३-०१-२०१६