पाऊस

Started by Vinay Joshi, December 18, 2009, 11:12:13 AM

Previous topic - Next topic

Vinay Joshi

पहिल्या पावसात बाळाचं अल्लडपणानं भिजणं
आईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणं
आता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणं

तरीपण बाळाचं आपल्या चिमुकल्या ओंजळीत पावसाचं पाणि साठवणं
साठवलेलं पाणी आईच्या अंगावर उडवण,
आईनं रागानं वटारलेले डोळे बघुन न बघितल्या सारखं करणं
पुन्हा दंग होऊन चिमुकल्या पावलांनी पावसात थिरकणं
आईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणं
आता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणं

पावसातच बसुन कागदि होडया वाहत्या पाण्यात सोडणं,
छत्री उलटी धरुन पडणाऱ्या गारा त्यात वेचण,
एका हातात गारा आणि एका हातात होडी धरून, एका डॊळ्यानं बाळाचं आईकडं बघणं
आईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणं
आता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणं

पावसाचं थांबणं,
चिंब भिजून बाळाचं घरात येणं,
खोट्या रागानंच आईन एक धपाटा घालणं,
बाळाचं नाराज होणं आणि
पाचच मिनीटात आईला जाउन बिलगणं,
लाडानच "आई भुक लागलीये" म्हणणं

गरम दुधाच्या पेल्यात
बिस्किट बुडवुन खाताना टेबलावर
इवलुशी मांडी घालुन बसलेल्या बाळाचं गोंडस दिसणं,
छोटसं नाक उडवत, तोंडात बिस्कीट ठेऊन
बाळाचं आईकडं बघून हसणं

असच चाललं अनेक वर्ष...

खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...
पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदलत गेलं...

हेच बाळ आता मोठं झालय...
खूप शिकून परदेशात गेलय....
आई मात्र तिथच राहिलीये...

इतके दिवस बाळात रमणारी आई ,
आता दासबोध, ज्ञानेश्वरीत जीव रमवतीये,
पहिला पाऊस येताच, त्याच खिडकीत येऊन
पावसात नाचणाऱ्या बाळाला शोधतीये...
पण
बाळ आता मोठं झालय...
खूप शिकून परदेशात गेलय....
खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...
पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...
परदेशातच सेटल होण्याच्या गोष्टी करु लागलय,
भुताच्या गोष्टी ऎकत, घरभर नाचत खाल्लेल्या
आईच्या हातच्या वरण-भाताचा घास त्याला डाचू लागलाय,
परदेशातला पिझ्झा-बर्गरच त्याला जास्त आवडू लागलाय

पावसात अल्लडपणानं नाचणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं
दप्तर पाठीला अडकवुन शाळेला जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं
ट्रॉली बॅग ओढत एअरपोर्टवरून परदेशात जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं
खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...
पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...

santoshi.world

Swateja

shardul

पावसात अल्लडपणानं नाचणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं
दप्तर पाठीला अडकवुन शाळेला जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं
ट्रॉली बॅग ओढत एअरपोर्टवरून परदेशात जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं
खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...
पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...

Surekh...  :)

rahuljt07

radavlaas na mitra....!
dolyaachya kada bhijlyaa aahet.
kantha datun aala ahe yar...
khup emotional kela na tu mala.... :'( :'( :'( :'(?

Parmita

khoop apratim kavita ahe... khoop chaan..

Mayoor

indradhanu

tumne to rula hi diya...
touched...........

prajkta

Shyam

Chaan aahe