भारत - एक महासत्ता

Started by गणेश म. तायडे, January 26, 2016, 12:07:14 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे



जगाच्या कानाकोपरात डंका एकच वाजतोय
भारत होईल महासत्ता प्रत्येक जण सांगतोय
भ्रष्टाचार पण संपूर्ण संपवल्या जाईल
प्रत्येक राजनेता जेव्हा ईमानदार होईल
बेरोजगारी तर कुठे दिसणारच नाही
पास व्हायला अभ्यासक्रम जेव्हा बनणार नाही
हुंड्यासाठी मुलगी कधीच नाही जळणार
मुलींची योग्यता जेव्हा समाजाला कळणार
शिकून सवरून सारे होतील ही सुशिक्षित
शिक्षणासोबत जेव्हा संस्कार राहतील सुरक्षित
खायला अन्न देखील खुप सारे राहील
कर्जबाजारी शेतकरी जेव्हा जिवंत राहील
ऋतू सुद्धा भारतात वेळेवरच येईल
माणसाला निसर्ग जेव्हा समजून येईल
पिझ्झा पेक्षा अँम्बूलन्स लवकर धावत येईल
प्राथमिक सुविधा जेव्हा साऱ्यांच्या लक्षात येईल
भारतीयांना देखील नागरिक म्हटल्या जाईल
वोट पेक्षा मोठं भारतीयांना जेव्हा समजल्या जाईल
अवताराची गरज इथे कधी भासणार नाही
हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाही जेव्हा कळणार नाही
सुख समृद्धी भारतात सदा ओसंडून वाहतील
तिरंग्याचे रंग जेव्हा मनात ठसवल्या जातील
भारताकडे वाकडे पाहण्याची हिंमत ना होईल
आतंकवादाला इथे जेव्हा सहारा ना राहील
असहिष्णूता देखील इथुन संपवल्या जाईल
राष्ट्रीय प्रार्थना जेव्हा खरंच पाळल्या जाईल
"स्वच्छ भारत, स्वस्थ भारत" ओळखल्या जाईल
घरासारखे भारताला जेव्हा सजवल्या जाईल
पाहता पाहता भारत देखील महासत्ता होईल
"सोने की चिडीया" म्हणून पुन्हा पाहील्या जाईल

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com