कोमल कळी

Started by Mayur Dhobale, January 27, 2016, 10:37:18 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

कोमल कळी...

तुझ्यात हरलो
विसरून जगाला ,
तुझ्यात विरलो,
विसरुन स्वतःला...
तु नसतांनाही तुझाच भास...
तु असतांना भेटीची आस...
आहेस तु ईतकी खास,
तुझ्या आठवणीत कटतो,
क्षणांचा प्रवास ...
मधुर तुझ ते हसणं
मधाळ तुझ ते बोलणं ...
उगाच माझ्यावर रुसणं..
तुच सांग कस फेडु तुझ हे उसणं...
लाखात एखादीच असते अशी...
आकाशात चमकते चांदणी जशी...
मोहकच तु, मनाला घालतेस भुरळ,
तुझ्या स्पर्शाने तर दगडही विरलं.....
नशिबच माझ मला तु भेटली ,
भेटताच क्षणी हृदयालापण खेटली...
क्षणात आपलीशी वाटली ,
सगळीकडे तुच भासली ...
पण माझी जरा गोची झाली ,
हृदय जरास फसलं...
मनाच वेड पाखरू ,
'कोमल' कळीवर बसलं ...
पाखराला कळीचा लागलाय इतका लळा.....
नसली उद्या जर सोबत ,
हृदयात निघतील लाखो कळा...

                  -  मयुर ढोबळे (https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/)

Mayur_bhamre


Mayur Dhobale