अखेरचा निरोप!!!

Started by श्री. प्रकाश साळवी, January 30, 2016, 08:43:46 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

का घुटमळतो जीव अखेरचा श्वास घेताना?
का अडखळतो श्वास अखेरचा निरोप घेताना?
कधी न केले मी तिर्थाटण
कधी न पूजले नर नारायण
कधी न जगलो मी स्वर्थाविण
सुखासाठी फिरलो वणवण
थर थर कापे आज तन हे
का जग हे सोडून जाताना ?   ।।1।।
वाढविले मी मोहा माया
ऊगा झिजविली माझी काया
माझी कामिनी !माझी तनया!
असाच भुललो का मी विषया?
का घाबरतो आज असा मी
बंध रेशमी हे तोडताना ?       ।।2।।
मी न सोडले माझे मी पण
कधि ना राहीलो संसाराविण
ना धर्माची मजला जाण
करीत राहीलो विषय सेवन
परी आज का घाम फूटला
आज येथुनी जाताना          ।।3।।

श्री.प्रकाश साळवी