वेडा पाउस

Started by madhura, February 02, 2016, 12:20:00 PM

Previous topic - Next topic

madhura


हा वेडा पाउस बघितलास?
रागावून पृथ्वीवर
निघून जातो दूर तिच्या पासून
................................वाफ बनून.
अन मग फिरत रहातो तिच्याच भवति
.................................ढग बनून
वाट बघत..........बोलावेल ती म्हणून.
पृथ्वीला तरी कुठं रहावतं त्याच्या शिवाय!
अन मग
पृथ्वीनं एक प्रेमाची फुंकर मारायचा अवकाश
कि बरसायला लागतो तो
सगळा राग विसरून
अन मग
भिजवून टाकतो पृथ्वीला सहस्त धारांनी.
मग पृथ्वी सुध्धा निश्वास सोडते
अन तृप होते भिजून गच्च
त्या बरसणार्या धारांनी.
हं....................
पृथ्वी अन पाउस....
आगदी तुझ्या अन माझ्या सारखेच
नाही का? 


केदार...

sangita_4101980

sundar Upama aahe !!
beautiful!!!!!!!