दत्त गारुडी

Started by विक्रांत, February 02, 2016, 07:31:06 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

बांधिला गाठीला
माल चोरलेला
गडगंज केला
सावकार

केली सोयरिक
मागुनिया भिक   
पोरबाळ पिक 
घर भरे

नाचतो अंगणी
कपडे फाडूनी
रात्रीस जागुनी
निद्रा दिनी

भिकेचे डोहाळे
जनास विकले
वाटेला लावले
मरू गेले 

मेलेल्या गावात
एकटा चौकात
सजल्या चितेत
रोज निजे   

धावूनिया दत्त
गारुडी तो येत 
केला विष मुक्त
विक्रांत हा

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



Ankush S. Navghare, Palghar

विक्रांत जी खुप सूंदर कविता आहे. एकदा तुम्हाला भेटायचि खुप इच्छा आहे...