* मी न अनोळखी *

Started by sangita_4101980, February 03, 2016, 11:50:49 AM

Previous topic - Next topic

sangita_4101980

मी न अनोळखी

प्रिये न चुकणारा प्रेमवीर न जगि,
मृगजलास कवटाळले मी अपराधी,
राधा विना हरी दुभंगी , तुझ्याविना मी ,
हृदयाची कवाडे उघड , मी न अनोळखी

वसुंधरा का करशी या गगनास पारखी
क्षितीज साक्षी तूच माझी रागिणी ,
सती विना ओम एकांकी ,तुझ्याविना मी,
लोचनद्वारे उघड मी न अनोळखी

ज्योती तू सलग्न , या दिव्याशी ,
प्रकाश साक्षी तूच माझी दामिनी,
सियाविना राम अधांतरी ,तुझ्याविना मी ,
बाहुपाश उघड , मी न अनोळखी


कुसुम तव मी गंध , तव अंतरी ,
वेली साक्षी तूच माझी पल्लवी ,
राणी तू दास मी, क्षमा ही स्वीकारावी ,
ओठांची स्मितरेषा उघड मी न अनोळखी

संगीता