काळजाचा गोळा

Started by Gorakhnath Borse, February 03, 2016, 06:02:53 PM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

शीर्षक: काळजाचा गोळा


गुदमरला श्वास माझा तरि मला कळना
विरहाच्या वेदनात हदय माझ जळना

अवघड झाल जगन आता
काळजाचा गोळा मला दिसना
आयुष्याचे भोग आहे की नाही
आता कुणाला कळना.....

गुदमरला श्वास माझा तरि मला कळना
विरहाच्या वेदनात हदय माझ जळना

हा दुःखाचा डोंगर कोसळला
तोही आता सावरना
मुलाची अंतयाञा मला
खांदयावर नेव्हना.....

गुदमरला श्वास माझा तरि मला कळना
विरहाच्या वेदनात हदय माझ जळना

हदय माझ फार जळल
तेही कुणाला कळना
म्हातार पणाच्या काढीच
बळ आता सोसवना.....

गुदमरला श्वास माझा तरि मला कळना
विरहाच्या वेदनात हदय माझ जळना

मरनाच्या शरनावर
अश्रु माझे थांबना
अग्नीदागाच्या आगेनेही
अश्रु माझे जळना
अश्रु माझे जळना.....

गुदमरला श्वास माझा तरि मला कळना
विरहाच्या वेदनात हदय माझ जळना.......


कवी ~ गोरखनाथ बोरसे लोणारी
            पञकार मालेगांव
            मो नं 8007980038