कोण होणार

Started by पल्लवी कुंभार, February 04, 2016, 12:34:57 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

नाही नाही
नव्हत्याच त्या चारर्चौघींच्या गप्पा
राजकारण तर सोडाच
क्रिकेटचा विषयही नव्हता रंगला
होता तो संवाद
फक्त त्याचा आणि तिचा

कौमार्याची खुमारी चढता
त्याच्या हातात तिचा हात मिसळला
प्रश्न तिने पुसता
भावना या उत्तरादाखल ओसंडल्या

प्रश्न म्हणूनी काय पुसता
सवाल होता साधा तिचा
कोण होणार म्हणून पुसले तिने
उत्तरांचा गालिछा त्याने अंथरला ....

तुझ्या पंचेद्रीयांच्या तृप्तीसाठी इंद्र होईल
माझ्या प्रेमात तुला पुरती भिजवणारा
फक्त तुझा श्रीहरी होईल
सत्याच्या बाजूने उभा ठाकणारा नीलकंठ असेल
आणि तुझ्या सावलीत माझी सावली मिसळलेला
धुंद असा मकरंद असेल

कर्माने श्रेष्ठ असा अर्जुन होईल
धर्माचे पालन करणारा कर्ण होईल
विचारांनी बलशाली असा मी फक्त तुझा भीम असेल
रात्रीलाही सोबत करणारा मी तुझा चंद्र असेल

दिशा हरवलेल्या गलबताचा नावाडी होईल
वळणावळणाच्या आयुष्याचा मी वाटाड्या होईल
ओळखता अंधार खोलीमधला
खिडकीतून डोकावणारा कवडसा असेल
आणि कोमेजूनही सदैव दरवळणारा बकुळ असेल

भरल्या त्या डोळ्यांनी
विश्वास तिने ठेवला
त्याच्या हातात तिने हात देऊन
बुडत्या सूर्याला निरोप दिला

~पल्लवी कुंभार

Suraj Nehete


NARAYAN MAHALE KHAROLA