माझ्या भावना

Started by Gorakhnath Borse, February 04, 2016, 07:50:51 PM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

              "~ माझ्या भावना ~"
 

सांगू कसा आई तुला
खेळ माझ्या मनातला
प्रेम कधी दिसणार तुला
लाडक्या या मुलातला..........

सुंदर तुझ्या नयनामधूनी
मला दिसते मधुर चांदनी
शब्द कधी कळनार तुला
आई माझ्या उरातला

सांगू कसा आई तुला
खेळ माझ्या मनातला.......

जुळते मन एकावेळी
शब्द जुळतात त्याच खेळी
सुर कधी कळणार तुला
माझ्या या गीतातला

सांगू कसा आई तुला
खेळ माझ्या मनातला.......

स्वष्न पडते तेव्हा मला
मांडीवर खेळवत होती तेव्हा मला
सुगंध कधी कळणार तुला
माझ्या या फुलातला

सांगू कसा आई तुला
खेळ माझ्या मनातला
प्रेम कधी दिसणार तुला
लाडक्या या मुलातला........



   कवी ~ गोरखनाथ बोरसे लोणारी
               पञकार मालेगांव
            मो नं 8007980038