मेल्यानंतर माणूस कुठे जात असेल?

Started by Rajesh khakre, February 07, 2016, 10:13:12 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

शोध स्वतःचा:

मेल्यानंतर माणूस कुठे जात असेल?
कि त्याच अस्तित्वच संपून जात असेल?

कुठल्या एखाद्या ग्रहावर त्याला प्रमोशन मिळत असेल?
की इथेच पाण्यात वाहून त्याची राख होत असेल?
शरीर इथेच संपते तर जिव कुठे जात असेल
मेल्यानंतर माणूस कुठे जात असेल?

हा गणपतराव जन्मला आल्यापासून त्याच स्वत्व असेल?
की याही आधी अन नंतर ही त्याच अस्तित्व असेल?
माणूस ज्याला "मी मी" म्हणतो हा "मी" कोण असेल?
मेल्यानंतर माणूस कुठे जात असेल?

ही सृष्टि अहोरात्र चालू आहे अगदी अविरत
कुणी आल्याच हिला आनंद ना गेल्याच् दुःख
तरीही प्रत्येकजण स्वतःला स्पेशल का समजत असेल?
मेल्यानंतर माणूस कुठे जात असेल?

शोधत असतो मी स्वतःच अस्तित्व या ब्रम्हांडात
हे विश्व एक अजब रसायन आणि प्रश्न अनेक मनात
मी एक अनंत अविचल अविनाशी अखंडित जिव असेल?
मेल्यानंतर माणूस कुठे जात असेल?
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(माझ्या कविता इमेज format मध्ये मिळवण्यासाठी whatsapp वर आपले नाव  व् ठिकाणासह विनंती पाठवा)