विरह

Started by पल्लवी कुंभार, February 11, 2016, 10:55:54 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

कधीतरी सायंसमयी
तू दिसेनाशी झाली
आकाशातल्या उजेडासम

शून्यात बुडालेली नजर
थकून गेली
वाटेकडे लागलेल्या डोळ्यांसम

हरवलेले चित्त,
घरबर सैरभर फिरणारी नजर
ठाव घेती तुझ्या अस्तित्वाचा
म्रुगभक्षी चित्त्यासम

लामणदिव्याच्या  संधिप्रकाशात
दरवळणाऱ्या धूप अगरबत्तीत
आठवतेय तुझी चैतन्यमूर्ती
गोकुळातल्या राधिकेसम

देणे घेणे, जमा खर्च
आवडनिवड अन तडजोड
संसारात हवी
तू अन मी
भातुकलीच्या खेळासम

वाट पाहतायत तू असण्याची
चार भिंतींना जोडलेली दारे
माझ्या मनाच्या कवाडासम

भुलवतायत या घटका
तुझ्या भासांनी
वाळवंटातल्या मृगजळासम

उगा मीही चमकतोय
अंधाऱ्या अंबरी
उत्तरेच्या ध्रुवताऱ्यासम

~ पल्लवी कुंभार

Sanju.....

हरवलेले चित्त,
घरबर सैरभर फिरणारी नजर
ठाव घेती तुझ्या अस्तित्वाचा
म्रुगभक्षी चित्त्यासम.....अप्रतीम