येईल का तो???

Started by rups, December 19, 2009, 11:21:45 AM

Previous topic - Next topic

rups

येईल का तो वार्यातून, आपल्याच तोर्यातून.
मनाची माझ्या छेडूनी तार, बनवेल का तो सुंदर धून.
कसे शब्दही होतील मुके , जेंव्हा घेईल तो माझा हातात हात,
हळव्या त्या क्षणात वीर्घ्ळू आम्ही, एक न सुचलेलं गीत गात.
वेगळं असं काहीसं आयुष्य मला, त्याच्यासोबात जगायचंय,
रीकाम हे आभाळ भरलेलं, फक्त त्याच्याच डोळ्यातून बघायचय.
मग आयुष्याची फुलवू स्वप्ने, एकमेकांच्या सोबतीने ,
कुठल्याही वादळावर मात करायला, कसे उभारू एका ताकदीने.
चांदण्यांच्या सड्यावरून चालत आम्ही जाऊ,
लाटांवर स्वार होऊन, आकाशाला भेटून येऊ.
अन कधी झाले मतभेद तर,खूप खूप भांडू,
'तुझी मी  अन माझा तू' हा करार हळुवार मांडू.
खरतर भेटच नाही अजुनी, तरी मला वाटते दुराव्याचे भय,
कदाचित यालाच म्हणतात प्रेम,कींवा कदाचित वेड वय.
खर्च असेल ना तो माझा?करेल ना माझी रक्षा?
ये ना रे आयुष्यात माझ्या,आता पुरे झाली शीक्षा...



Rupa... :)



omkarjo

अन कधी झाले मतभेद तर,खूप खूप भांडू,
'तुझी मी  अन माझा तू' हा करार हळुवार मांडू

ये ना रे आयुष्यात माझ्या,आता पुरे झाली शीक्षा...

Khupch chaan yaar...
mast aahe...
best.. ;)

MK ADMIN

अन कधी झाले मतभेद तर,खूप खूप भांडू,
'तुझी मी  अन माझा तू' हा करार हळुवार मांडू.


Awesome...Loved those 2 lines and entire poem too

anagha bobhate


nirmala.

वेगळं असं काहीसं आयुष्य मला, त्याच्यासोबात जगायचंय,
रीकाम हे आभाळ भरलेलं, फक्त त्याच्याच डोळ्यातून बघायचय.

ya donlines kharach khup sundar aahet dear.........
whole kawita is nice yar
too good........

manatil oli ahet........kharach..... :)

rups


nirmala.

 वेगळं असं काहीसं आयुष्य मला, त्याच्यासोबात जगायचंय,
रीकाम हे आभाळ भरलेलं, फक्त त्याच्याच डोळ्यातून बघायचय

त्याच्या विश्वात मला, रम-मान व्हायचय
अस्तित्व  माझे पुर्णतः त्यातच गुन्त्वाय्चय
वेगळं असं काहीसं आयुष्य मला, त्याच्यासोबात जगायचंय,

sorry but tujhya ya don oli kharach khup bharlya manat......... :)
mhanun thodese lihawese watle........
by :)

shardul

Nice nirmala.

and good poem

nirmala.


Rahul Kumbhar

Please put the title of poem in Marathi ..Please read the rules and regulations