स्वप्न ते सरले

Started by gayatrikalikar, February 15, 2016, 11:51:12 AM

Previous topic - Next topic

gayatrikalikar

सुर ते नभीचे, वादळात अडखळले....
हास्य ते कळीचे, न फुलताच कोमेजले....
पावले ही आता वाटेतच थकले...
माझे माझे म्हणणारे स्वप्न ते सरले.....

न वळलो कुठेही, वाट ती संपेच ना..
माझ्या कल्पनेचे ओझे माझ्या माथी टिकेना...
निःशब्द भावनेतुन उमजले सत्य ते ओठांवरचे,
न कळले कसे शब्द ओल्या पापणीचे,
हरलो असे चुकलो कसे भावांचे मोह न उरले...
माझे माझे म्हणणारे स्वप्न ते सरले....

अथांग सागरी न दिसले, क्षितिजाची अंतरे...
ओल्या पावलांनी उमटले, सुखांचे शिंपले...
एकांत किनारी वसलेल्या वाळुंची क्षणचित्रे,
हरलेले मन माझे उसवलेले बंध जसे,
भिजलो असे बुडलो कसे लाटांचे तरंग उठले....
माझे माझे म्हणणारे स्वप्न ते सरले.....

बेड्यात अडकलेले उभे आयुष्य स्मरले...
पापणीच्या हाकेत दुःखाचे अश्रु भिजले...
निसटत्या ओंजळीत उरले भासांचे हिंदोळे,
बंधने गळफास झालीत, नकोसे झाले जग सारे,
जगलो असे फसलो कसे निरर्थक जीवन हे ठरले...
माझे माझे म्हणणारे स्वप्न ते सरले.....