बाजार

Started by Dnyaneshwar Musale, February 16, 2016, 12:02:43 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

दिस डुबतीस गेला
परी  धनी घरा नाय आला
डोकी सारून पदर उभी राहे ही दारात
काळजी लागे या तिच्या मना जिव वावरात.


चुलीस लाविती काटाकुटा
कधी थापिती गोवऱ्या.
नवर्यासंग जाई वावरात
आड आला तिथं दुष्काळाच्या भवऱ्या


पाखडून समद्या कवड्याच
निघे  रे सुपाशी
तिचा कधी दिस निघुन
जाई उपाशी

पाण्याला जाई घेऊन
मडकी उराव
उतानीच रे पण तिच्या
आयुष्याची बारव

कस रे हे शेतकर्याच्या
बायकोच कॅरॅकटर
लेकराची नाळ थोडण्यास
नाही रे तिथं डाक्टर.

टांगते लेकराची
बांदावर  झोळी
दुध पाणी विना काय
झोपावे त्याने उघड्या डोळी.


कर्जबाजरी नवरा कधी
रस्त्यातच जातो तिला सोडून
ती कोना सांगेल
तिचं दुःख ओरडून.

सगळा संसार
येतो तिचा  रस्त्यावर
पण इथे फक्त
स्वार्थी जनांनाचाच बाजार.