फिरीस्ती पोरं

Started by Dnyaneshwar Musale, February 19, 2016, 11:58:05 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

फुकटच असतो
डोक्याला घोरं
ती म्हणजे
फिरीस्ती पोरं.
कधी रस्त्यावर
तर कधी  चौकात,
हि पोरं नसतात
कोणाच्या धाकात.

फिरायला गाडी कोरी
सोबतीला दोन चार पोरी
चहाच्या टपऱ्या हेच त्यांचं घर
फिरती  इकडून तिकडून हे  गावभर
शिकविल का कोणी त्यांना काही
कोणाच हे ऐकतीच नाही.

कॉलेजला होतात लेट
करत असतात रेटा रेट
सार कॉलेज त्यांचीच मालमत्ता
परीक्षेला नसतो त्यांचाच पत्ता
करीती हातवारे याची त्याची नक्कल
येईल का त्यांना कधी अक्कल.


खिशात नसते रुपयाची दमडी
फुकटची खातात एक एक कोंबडी
इकड उधारी तिकडं उधारी
जाहिरात करतात स्वतःची दारोदारी
कुणी तरी यांना काही तरी करा
नायतर येड्याच्या हॉस्पिटल मध्ये
भरती करा.


सकाळ ना संध्याकाळ
ना कुठलीच  वेळ
दिवसभर भरवतात
टाईमपास चा खेळ
कसलच नाही
कवडीचही भान
भरवेल कि कोणी 
यांच ज्ञानान  कान.

गावभर म्हणती आमचंच नाव
फुकटचा कशाला यांना भाव
शहाणा हो रे आता तरी तु जरा
फिरीस्ती पणा बंद करा.