चादर धुक्याची ... 1

Started by शिवाजी सांगळे, February 21, 2016, 11:42:28 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चादर धुक्याची ...

      खिडकीतुन डोकावून पाहिलं तेंव्हा धुक्याच्या चादरीने बाहेरचा सारा माहोल व्यापून  टाकला होता, पानां फुलांवर दव थेंब नाजूक नक्षीकाम केल्या सारखे सजून धजून लकाकत होते. धरणीवर यायला आसुसलेली सूर्यकिरणे हळूवार पावलांनी धुक्याला चिरून येत होती, जस जसं त्यांच वर्चस्व वाढु लागलं तसं फुलांवर असलेले दव थेंब सप्तरंगात चमकू लागले जणू हिरे, मोत्यांचा मेळा भरला आहे.

     धुक्याच्या एका वेगळ्याच सुगंधा सोबत अनोखी धुंद हवा, बेहोश करणारी जाणवत होती. एकंदरीत वातावरण फारच छान उत्साहित, प्रफुल्लित करणारे होते. वेगवेगळ्या प्रजातीचे अनेक पक्षी आपली दिनचर्या पार पाडण्यासाठी घरटयातून बाहेर पडू लागले होते, त्याच्या चिवचिवाटाने वातावरणात वेगळेच मधुर संगीत ऐकू येऊ लागले, कॉफीचे घोट घेत घेत मी या साऱ्या संगीतमय वातावरणाचा आनंद मनापासून घेत होतो, त्याच दरम्यान महेंद्र कपूरसाहेबाचा आवाज कानी पडला....

"ये निले गगन के तले, धरतीका प्यार पले..."

         किती वास्तविकता आहे ह्या शब्दांमध्ये! जणू माझ्या मनातले भाव ते व्यक्त करीत आहेत. कदाचित अशाच सुंदर प्रेमाचा विचार करून ईश्वराने या धरणीचं निर्माण केलं असावं? असं म्हणतात कि एके काळी धर्तीवर खूप आनंद व शांतता होती, "जीवो जीवस्य जीवनम्" तत्वानुसार एक जीव दुसरया जीवाला खात खात ह्या सृष्टीचे चक्र सुरु होते व त्याच नियमा नुसार सर्व जीव आनंदाने रहात व जगत होते, आणि त्या जीवां मध्ये थोडा वेगळा जीव माणुस सुद्धा होता.

   मनुष्य सुरवातीच्या काळात ईतर वन्य जनावरां सारखा गुहेत रहात होता, जे मिळेल ते खाऊन आपली उपजीविका करीत होता, तसा मानव हुशार, बुद्धीमान असल्यामुळे त्याला स्वतःच्या शक्तिचे ज्ञान झाले त्या दिवसापासून त्याने त्या शक्तीचा उपयोग सुरु केला. त्याने दगडापासून हत्यारे बनविली व शिकारी साठी त्यांचा उपयोग करू लागला त्यामुळे त्याचं काम सोपं झालं. अग्नीला इतर जीव घाबरतात ह्याचं ज्ञान त्याला झालं अन तो इतर जीवां पेक्षा श्रेष्ठ व ताकदवान झाला दरम्यान त्याला स्वतःच खाद्य तापवुन/भाजून खाण्याचं ज्ञान झालं व सवय पण लागली. हळू हळू तो गुहेतून बाहेर पडू लागला आणि गुहेपेक्षा चांगल्या ठिकाणी राहू लागला, त्या स्थितंतरात वेगवेळ्या हत्यारांचा शोध होतच राहिला व तसा तसा तो, प्राण्याचा मनुष्य प्राणी होऊ लागला. मुळचीच हुशार बुद्धी आता स्वार्थी होऊ लागली व त्याच दरम्यान त्याला चाकाचा शोध लागला, तेव्हां पासून त्याची प्रगती सर्व क्षेत्रात वाढु लागली.

        चाकाच्या शोधाने त्याची मुळ स्वार्थी बुद्धी सर्वावर वरचढ होऊ लागली, त्याने वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या वस्त्या करायला सुरवात केली आणि या मध्ये येणाऱ्या सर्व अडचणींवर त्याने स्वतःच्या चतुराईने मात करून आपलं वर्चस्व कायम केलं. आता मनुष्य प्राणी पृथ्वी वरील श्रेष्ठ प्राणी झाला, मग पुढे अनेक वेगवेगळ्या वस्त्या होऊ लागल्या, त्या अनुषंगाने त्याचे नियम, कायदे तयार झाले, जे काही ठिकाणी आजही अस्तित्वात आहेत. नविन साम्राजे निर्माण झाली, वस्तीवाद व साम्राज्यवादाच्या आपसातील स्वार्थांमुळे त्यांच्यात लढया होऊ लागल्या. या सर्वात जास्त करून मानवाच्या खाद्य व ईतर गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने पृथ्वी वरील जे मुळ मुके जीव होते त्याच्या बेसुमार हत्या होऊ लागल्या.

       
=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941 +919545976589 email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९